नवी दिल्ली
संपत्ती गहाण ठेवून ग्राहकांना कर्ज देणाऱया एचडीएफसी कंपनीने शुक्रवारी आपल्या कर्जाचे व्याजदर 0.20 टक्क्मयांनी घटविले आहेत. हा निर्णय स्टेट बँकेच्या कर्जाच्या व्याजदरातील क्याजदर कपातीच्या बरोबरीत असणार आहे. किरकोळ कर्जावरील व्याजदर 0.20 टक्क्मयांनी कमी केला असून नवीन दर 12 जूनपासून अमलात येणार आहे. सदरचे व्याजदर हे 7.65 टक्के ते 7.95 टक्क्मयांच्या दरम्यान राहणार आहे. मागील महिन्यात रिझर्व्ह बँकेने रेपोदरात 0.40 टक्क्मयांची कपात केली आहे. ही दरातील घसरण 4 टक्क्मयांवर असून प्रथमच ऐतिहासिक घसरण राहिली आहे.