प्रतिनिधी / वास्को
देशांतर्गंत हवाई प्रवासात काल शनिवारी दाबोळी विमानतळावर 136 हवाई प्रवासी उतरले. दुपारच्या वेळी इंडिगो एअरलाईन्सच्या तीन विमानांचे दाबोळी विमानतळावर आगमन झाले. परतीच्या प्रवासात तीन विमानांतून 329 प्रवाशांनी हैंद्राबाद, बेंगळूर व दिल्लीला जाण्यासाठी उड्डाण केले.
काल शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास इंडिगो एअरलाईन्सचे विमान 20 प्रवाशांसह हैद्राबादहून दाबोळी विमानतळावर दाखल झाले. याच विमानातून दुपारी दोनच्या सुमारास 68 प्रवाशांनी हैद्राबादला प्रयाण केले. दुपारी 1 च्या सुमारास बेंगळूरहून इंडिगो एअरलाईन्सचे विमान 38 प्रवाशांसह दाखल झाले. हेच विमान 2.15 वा. 115 प्रवाशांसह बेंगळूरकडे मार्गस्थ झाले. त्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास दिल्लीहून इंडिगो एअरलाईन्सचे विमान 78 प्रवाशांसह दाखल झाले. याच विमानातून 146 प्रवाशांनी दिल्लीकडे प्रयाण केले.
काल एकूण 136 प्रवासी गोव्यात हवाईमार्गे दाखल झाले. तर एकूण 329 प्रवाशांनी हैद्राबाद, बेंगळूर व दिल्लीकडे उड्डाण केले.