प्रतिनिधी / कुरुंदवाड
कुरुंदवाड शहरातील अंतर्गत रस्त्यासह शहरातील मुख्य रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे याच खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून त्याचा नागरिकांना त्रास होऊ लागला आहे तरी पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी तात्काळ हे रस्ते दुरुस्त करावेत अन्यथा 24 जून पासून नगरपालिकेसमोर साखळी उपोषण आंदोलन केले जाईल असा इशारा शिवसेनेच्या वतीने शिवसेना शहर प्रमुख राजू आवळे यांनी एका निवेदनाद्वारे मुख्याधिकारी निखिल जाधव यांना दिला आहे.
या निवेदनात शहरातील एकही रस्ता सुस्थितीत नाही या रस्त्यावरून जाताना पादचार्यांना बरोबर वाहनधारकांना ही तारेवरची कसरत करुन जावे लागत आहे सध्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने या खड्ड्यात पावसाचे पाणी साचून राहिले आहे या कड्यावरून एखादे वाहन भरधाव वेगाने घेण्यात पायी चालत जाणाऱ्या नागरिक व महिलांच्या अंगावर खड्ड्यातील घाण पाणी उडत आहे यामुळे अनेक वेळा वादावादीचे प्रसंग घडत आहेत.
पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी शहराच्या सुधारित नळ पाणीपुरवठा योजनेसाठी पाईप लाईन टाकण्यासाठी रस्ते खुदाई करावी लागणार आहे त्यामुळे पाईपलाईन झाल्यावरच रस्ते केले जातील असे सांगण्यात आले होते पण पाणीपुरवठा योजना वादाच्या भोवऱ्यात सापडल्याने सद्यस्थितीला पाईप लाईन होईल आणि रस्ते दुरुस्त होतील याची सुतराम शक्यता वाटत नाही.
दरम्यान पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी रस्ते दुरुस्त करण्याचा गवगवा केला होता पण केवळ गवगवा होता अध्यापन रस्ते दुरुस्त झालेच नाहीत तरी नागरिकांना होणारा त्रास थांबवण्यासाठी पालिकेने येत्या आठ दिवसात रस्ता दुरुस्ती चे काम तात्काळ पूर्ण करावे अन्यथा पालिकेसमोर येत्या 24 जून पासून साखळी उपोषण आंदोलन करणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या निवेदनावर शहरप्रमुख राजू आवळे मार्केट कमिटी सभापती आप्पासाहेब भोसले महिला आघाडीच्या वैशाली जुगळे तसेच रामभाऊ माळी सुहास पासोबा बाबासाहेब गावडे संतोष नरके सौरभ जासूद दिग्विजय चव्हाण अफजल महत सुनंदा खोकाटे भारती पवार आधी पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.