प्रतिनिधी / शिरोळ
ठेकेदाराने मुदतीत काम पूर्ण न केल्याने ठेकेदार चा ठेका रद्द करण्यात आला आहे 2009 लाटवाडी शिवनाकवाडी लाट व शरद वाढ शिरदवाड या चार गावचे संयुक्त नळ पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती त्याचा ठेका त्यावेळी एका ठेकेदारांना देण्यात आला होता ठेकेदाराने अद्याप काम पूर्ण केले नसल्याने त्याचा ठेका रद्द करण्यात आला आहे.
शिरोळ तालुक्यातील लाट लाटवाडी शिवनाकवाडी व शिरदवाड या गावा करिता संयुक्त नळ पाणीपुरवठा योजना 2009 मंजूर करण्यात आली होती. त्याचा ठेकाही देण्यात आला होता ठेकेदाराने अपूर्ण काम केल्याने या गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी बोर विहीर कूपनलिका याचा आधार घ्यावा लागत होता वारंवार मागणी करूनही काम पूर्ण केले नाही अखेर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या ठेकेदाराला ठेका रद्द केला.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच बैठक होऊन या नळ पाणीपुरवठाच्या आढावा बैठकीमध्ये पंचगंगा नदी ऐवजी घोसरवाड येथील दूध गंगा नदीच्या पात्रातून या तीन गावासाठी स्वतंत्र नळ पाणीपुरवठा योजना नुकतीच मंजूर करण्यात आली आहे यासाठी अंदाजे दोन कोटी 50 लाख रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे लाटवाडी शिवनाकवाडी व शिरदवाड या तीन गावातील नागरिकांना व मुबलक पाणी पुरवठा लवकरच होणार आहे यासाठी पंचायत समितीच्या सभापती सौ मीना जमादार उपसभापती मल्लू खोत जि प सदस्य विजय भोज यांच्यासह अन्य पधाधिकारी व अधिकारी यांचे सहकार्य लाभले असल्याची माहिती ग्रामीण नळ पाणीपुरवठा योजनेचे उपअभियंता आर बी साठे यां