प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगावात पुन्हा सुपारी खुनाचा जमाना सुरू झाला आहे. एकाकडून सुपारी घेऊन दुसऱयाचा गेम करण्यासाठी टोळय़ा तयार झाल्या आहेत. अशाच एका सुपारी टोळीतील दोघा जणांना शनिवारी खडेबाजार पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीतील प्रमुख गुन्हेगाराने पुणे व भिवंडी येथेही गुन्हे केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.
विशालसिंग विजयसिंग चव्हाण (वय 21, मूळचा रा. चिक्कनंदिहळ्ळी, ता. बैलहोंगल, सध्या रा. शास्त्राrनगर), प्रथमेश नारायण गणिकोप्प (वय 19, रा. शास्त्राrनगर) अशी अटक करण्यात आलेल्या जोडगोळीची नावे आहेत. या टोळीतील आणखी काही जण पोलीस पथकाच्या नजरेत आहेत.
खडेबाजारचे एसीपी ए. चंद्राप्पा, मार्केटचे एसीपी एन. व्ही. बरमनी, गुन्हे तपास विभागाचे एसीपी महांतेश्वर जिद्दी यांच्या नेतृत्वाखाली खडेबाजारचे पोलीस निरीक्षक धिरज शिंदे, पोलीस उपनिरीक्षक आर. बी. सौदागर, हवालदार एस. एम. शिंदे, व्ही. एन. कंठीकर, डी. जी. हट्टीकर, बी. ए. नवकुडे, बी. पी. उज्जनकोप्प, प्रकाश सनमनी, आर. बी. गणी आदींचा समावेश असलेल्या विशेष पथकाने ही कारवाई केली आहे. या जोडगोळीकडून एक स्वीप्ट डिझायर कार, एक पल्सर मोटारसायकल, कोयता, तलवार, दोन मोबाईल संच आदी जप्त करण्यात आले आहे. खंडणी उकळणे, खंडणीसाठी धमकावणे, खुनाची सुपारी घेणे आदी गुह्यांत केवळ बेळगावच नव्हे तर पुणे, भिवंडी पोलिसांनाही हवा असलेल्या विशाल चव्हाण हा खडेबाजार पोलिसांच्या जाळय़ात अडकला असून त्याच्यावर दोन राज्यांत अनेक गुन्हे दाखल आहेत.
बेळगाव पोलीस गेल्या सहा महिन्यांपासून विशालच्या मागावर होते. ही टोळी पोलिसांना गुंगारा देत होती. पोलीस आयुक्त बी. एस. लोकेशकुमार, उपायुक्त सीमा लाटकर व यशोदा वंटगोडी आदी वरि÷ अधिकाऱयांनी पोलीस पथकाचे कौतुक केले आहे. या टोळीतील आणखी काही जण पोलिसांच्या टप्प्यात आहेत.
पोलीस अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार 23 जानेवारी 2020 रोजी हुलबत्ते कॉलनी येथील मुकेश कामटे यांनी विशाल चव्हाणविरुद्ध खडेबाजार पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. त्यांना 1 लाख रुपये खंडणीसाठी धमकावण्यात आले होते. खंडणी दिली नाही तर जीवे मारण्याची धमकी फोनवरुन देण्यात आली होती. या प्रकरणी भा.दं.वि. 387, 506, 109, सहकलम 34 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला होता.
खुनी हल्ला प्रकरणानंतर फरारी
विशाल चव्हाण व त्याच्या साथीदारांनी केवळ बेळगावच नव्हे तर पुणे, भिवंडी आदी ठिकाणीही धुडगूस घातला होता. बेळगाव पोलीस त्याच्या मागावर होते. तो वारंवार आपली ठिकाणी बदलत होता. 1 जानेवारी रोजी शहापूर येथे अभिजित भातकांडे या युवकावर झालेल्या खुनी हल्ला प्रकरणानंतर तो फरारी होता. खंडणीसाठी त्याने अनेकांना धमकावले आहे. बेळगावातील मटका व जुगार लॉबी त्याच्यामागे असल्याची माहिती पोलीस तपासात उघडकीस आली आहे.
भिवंडी येथील गोळीबारप्रकरणी गुन्हा दाखल
खडेबाजार पोलिसांनी अटक केलेला विशालसिंग चव्हाण हा पुणे व भिवंडी पोलिसांनाही हवा होता. 20 ऑक्टोबर 2019 रोजी ठाणे जिल्हा भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष राजेश उर्फ विजू गायकर यांच्यावर भिवंडीजवळ गोळय़ा झाडण्यात आल्या होत्या. या प्रकरणात विशाल भिवंडी पोलिसांना हवा असून पुणे येथील डेक्कन पोलीस स्थानकातही खुनी हल्ला प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेळगावातील खडेबाजार, टिळकवाडी, शहापूर येथे प्रत्येकी एक तर कॅम्प पोलीस स्थानकात त्याच्यावर 2 गुन्हे दाखल झाले आहेत. पाच वर्षांपूर्वी याच खडेबाजार पोलीस स्थानकात खुनी हल्ला प्रकरणी त्याच्यावर एफआयआर दाखल झाला होता.