सांगली प्रतिनिधी
जत तालुक्यातील बिळूर येथील चाळीस वर्षे व्यक्तीचा शुक्रवारी कोरोनाने मृत्यू झाला. हा जिल्ह्यातील कोरोनाचा अकरावा बळी ठरला आहे. तर नवीन सात रुग्ण वाढले, एकूण रुग्ण संख्या 326 झाली आहे, तर उपचारातील रुग्णसंख्या 101 आहे. अद्यापही तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.
जिल्ह्यात शुक्रवारी नवीन सात रुग्ण वाढले, त्यामध्ये शिराळा तालुक्यातील नाटोली, मोहरे, मिरज शहर, मिरज तालुक्यातील मौजे डिग्रज ,कवठेमंकाळ तालुक्यातील शिंदेवाडी येथे प्रत्येकी एक रुग्ण वाढला आहे. जत तालुक्यातील बिळूर येथे दोन रुग्ण वाढले.
जत तालुक्यातील बिळूर येथील चाळीस वर्षे व्यक्तीला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती.कोरोना ची लागण झाल्यापासून ही व्यक्ती अत्यवस्थ अवस्थेत होती. त्यामुळे तिच्यावर मिरजेच्या भारती हॉस्पिटल येथे अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. पण उपचारादरम्यान शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला. या मृत्यूमुळे जिल्ह्यात कोरोनाने अकरावा बळी गेला आहे.