शिरोळ / प्रतिनिधी
हरोली ता. शिरोळ येथील वीज जोडणीचे काम करीत असताना विजेचा धक्का लागून वायरमनचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी घडली. याबाबत शिरोळ पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, नांदणी येथील वायरमन सौरभ कांबळे वय वर्ष 25 व त्याचे साथीदार जगताप हे दोघे हरोली ता शिरोळ येथील विजेच्या खांबावर ती बिघाड झाल्याने ती दुरुस्ती करत असताना अचानक विजेचा धक्का बसल्याने सौरभ कांबळे याचा विजेच्या पोलवरच मृत्यू झाला.
सौरभ हा विजेच्या पोल वरती बसून काम करत होता. यावेळी अचानक विद्युत प्रवाह आल्याने जोराचा धक्का बसून त्याचा पोलवरच मृत्यू झाला. त्यामुळे खाली डोकं वर पाय होऊन मृतदेह अडकून पडला होता. या घटनेने हरोली व नांदणी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.