तालुक्मयातचारनवीनरूग्ण.साखळीत 3 नवीनरूग्णांसहसंख्या 29 वर.
डिचोली/प्रतिनिधी
साखळी भागात कोरोना बाधीत रूग्णांची संख्या वाढतच असल्याने साखळीतील देसाईनगर, गावठण व भंडारवाडा हे तीन भाग मायक्रो कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. साखळीत आणखीन 3 नवीन रूग्णांची भर पडल्याने साखळीतील रूग्ण संख्या 29 झाली आहे. कारापूर सर्वण पंचायतक्षेत्रातील सर्वण येथे पहिला कोरोना रूग्ण आढळून आला असल्याने या भागात भीतीचे वातावरण परसले आहे. मंगळ. दि. 30 रोजी डिचोली तालुक्मयात एकूण चार नवीन रूग्ण आढळून आल्याने आता रूग्णांची संख्या 33 वर पोहोचली आहे.
साखळी भागात सध्या कोरोना बाधीत रूग्णांची संख्या वाढतच आहे. सोमवारी साखळीत एकदमच 17 सकारात्मक रूग्ण आढळून आले होते. त्यामुळे साखळीतील रूणांची संख्या 26 झाली होती. तर काल मंगळवारी दि. 30 रोजी आणखीन 3 तीन नवीन सकारात्मक रूग्ण आढळून आल्याने हि संख्या 29 झाली आहे. सध्या रूग्ण आढळून आलेल्या भागातील लोकांच्या स्वेब टेस्ट सुरूच असून लोकांना खबरदारी बाळगण्याचे आवाहन आरोग्याधिकारी डॉ. उत्तम देसाई यांनी केले आहे.
मंगळवारी साखळीत आढळलेल्या रूग्णांमध्ये एक देसाईनगर भागातील, एक रूग्ण भंडारवाडा येथे तर एक रूदेश्वर कॉलनी हरवळे येथील आहे. यापूर्वी देसाईनगर भागात 13 रूग्ण आढळून आले होते. त्यात आता आणखीन एका रूग्णाची भर पडल्याने संख्या 14 झाली आहे. भंडारवाडा वरची हाळी भागात 9 आढळून आले होते. तेथे एक रूग्ण वाढला आहे. त्याचप्रमाणे गावठण, हाऊसिंग बोर्ड, मुजावरवाडा येथे रूग्ण मिळाले होते. तर आता रूदेश्वर कॉलनी हरवळेत नवीन रूग्ण आढळला आहे.
मुख्यमंत्र्यांनी घेतली तातडीची बैठक.
साखळीत कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल मंगळवारी साखळी रवींद्र भवनात एक महत्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीला सखळीचे नगराध्यक्ष यशवंत माडकर, उपनगराध्यक्षा कुंदा माडकर, इतर नगरसेवक, मुख्याधिकारी प्रवीणजय पंडित, आरोग्याधिकारी डॉ. उत्तम देसाई व इतरांची उपस्थिती होती.
या बैठकीत साखळीतील सर्व मैदान, खुल्या जागा, बालोद्यान व इतर लोकांचा जमाव होणाऱया जागा सील करण्यात याव्यात. तसेच जमाव करणाऱया लोकांवर कारवाई करण्यात यावी. साखळीतील व्यापाऱयांनी आपली दुकाने स्वेच्छेने उघडावी व सक्तीने सामाजिक सुरक्षा अंतर सांभाळावे. अशी सुचना करण्यात आली. कोरोना बाधीत रूग्णांच्या संपर्कात आलेल्या तसेच सर्दी, ताप, खोकला असलेल्या लोकांनी आपल्या संबंधित नगरसेवकाशी संपर्क साधून आपली कोवीड चाचणी करून घ्यावी. उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे कंटेनमेंट झोनमधील लोकांना जिवनावश्यक वस्तू पुरविण्याचे ठरविण्यात आले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सर्व संबंधित अधिकाऱयांना सुचना देत सुरक्षा राखण्याचे आवाहन केले.
देसाईनगर, गावठण व भंडारवाडा मायक्रो कंटेनमेंट झोन.
साखळीतील देसाईनगर भागात सर्वाधिक 14 रूग्ण आढळून आले आहेत. भंडारवाडा येथे आतापर्यंत 10 रूग्णांची नोंद झाली आहे. तर गावठण भागात एक रूग्ण आढळून आल्याने या भागांना मायक्रो कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आले आहेत. तर या भागाच्या सभोवतालचा भाग हा कोवीड बफर झोन ठरविण्यात आला आहे. त्यामुळे या बफर झोनमधील लोकांनीही काळजी घेणे बंधनकारक आहे.
सर्वण भागात पहिल्या कोरोना रूग्णाची नोंद.
कारापूर सर्वण पंचायत क्षेत्रातील सर्वण या भागात पहिल्या कोरोना बाधीत रूग्णाची नोंद झाली आहे. त्यामुळे या भागात लोकांनी धास्ती घेतली आहे. सदर इसमाचा साखळी भागात दुकान असून त्याला साखळीतून कोरोनाचा संसंर्ग लागू झाल्याची शक्मयता आहे. साखळीतील एका कोरोना बाधीत रूग्णांशी संपर्क आल्यामुळे त्याची चाचणी करण्यात आली होती. ती सकारात्मक निघाली आहे. त्यामुळे या भागात लोकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
डिचोलीतील सरकारी कार्यालयांमध्येही कोरोनाचे वारे.
साखळीत आढळून आलेल्या एका कोरोना सकारात्मक रूग्णाचे डिचोलीथील एका सरकारी कार्यालयात नियमित येणे जाणे असल्याने सदर कार्यखलयातील 50 जणांची स्वेब चाचणी घेण्यात आली आहे. तसेच अन्य एका कार्यालयातील कनि÷ अभियंता सकारात्मक मिळाल्याने त्या कार्यालयातघलही कर्मचाऱयांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. सदर अभियंता संपर्कात आलेल्या डिचोली नगरपालिकेतील 5 कर्मचाऱयांच्याही चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोरोनाचे वारे सरकारी कार्यालयांमध्येही पोहोचले आहे.