कुंभोज / प्रतिनिधी
हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथील कुंभोज – दानोळी रोडवरील माळी मळयाशेजारी राहणाऱ्या 24 वर्षीय परप्रांतीय एका तरूणाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्याच्या संपर्कात एकूण 16 व्यक्ती आले होते. त्या सर्वांचा कोरोना अहवाल रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. अशी माहिती सावर्डे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षल शिखरे यांनी दिली.