क्रूड्स आडनावाचे एक कुटुंब गुहेत राहत आहेत. नैसर्गिक आपत्तीमध्येही हे कुटुंब तग धरून आहे. कारण ग्रुग याने पूर्वीपासून निसर्गाला जपले आहे. ग्रुगची एप ही वयात आलेली मुलगी आहे. आपल्या वडिलांची शिस्त तिला मान्य नाही. एकाच गुहेत राहणे तिला पसंत नाही. आपल्या वडिलांविरोधात ती सतत बंड पुकारत असते. या कुटुंबामध्ये आणखी बऱयाच धमाल गोष्टी घडतात त्याची कहाणी द क्रूड्स 2 या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ख्रिस सॅण्डर्स यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून हा एक ऍनिमेशनपट आहे. या चित्रपटातील व्यक्तीरेखांना निकोलस केज, एमा स्टोन, रायन रेनॉल्ड्स, पॅथरिन किनर, क्लार्क डय़ुक यांचा आवाज लाभला आहे.
-संकलन : अपूर्वा सावंत, मुंबई