दोन दिवसात नव्याने रुग्ण नाही : 224 जण कोरोना मुक्त : कोरोना सक्रिय संख्या 28
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्ग जिल्हय़ात कोरोना वाढीचा वेग मंदावला असून गेल्या दोन दिवसात एकही नवा रुग्ण आढळला नाही. कोरोना बाधित रुग्णही बरे होत आहेत. मंगळवारी आणखी तीन रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून एकूण 224 रुग्ण कोरोना मुक्त झाले. त्यामुळे पुन्हा कोरोना मुक्तीकडे जिल्हय़ाची वाटचाल सुरू झाली असून आता कोरोना सक्रिय रुग्ण 28 आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.
जिल्हय़ात आतापर्यंत एकूण 258 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यातील एकूण 224 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. पाच रुग्णांचा मृत्यू झाला असून एकजण मुंबईला गेला. त्यामुळे सद्यस्थितीत जिल्हय़ात फक्त 28 सक्रिय रुग्ण आहेत. संशयित 18 रुग्ण आयसोलेशन वार्डमध्ये आहेत. या रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.
जिल्हय़ात कोरोना नमुना तपासणी लॅब सुरू झाल्यामुळे कोरोना तपासणी प्रमाण वाढविण्यात येत असून रिपार्टही लवकर मिळत आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह असल्यास लवकर आढळत असल्याने कोरोनावर नियंत्रण ठेवणे शक्मय होत आहे, जिल्हय़ातील नागरिकांनी असेच सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱयांनी केले आहे.
तपासण्यात आलेले एकूण नमुने 4476
अहवाल प्राप्त झालेले नमुने 4400
आतापर्यंत पॉझिटिव्ह नमुने 258
निगेटिव्ह आलेले नमुने 4142
अहवाल प्राप्त न झालेले नमुने 76
सद्यस्थितीत जिल्हय़ातील सक्रिय रुग्ण 28
अन्य जिल्हय़ात तपासणीसाठी गेलेले रुग्ण 1
मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 5
डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण 224
विलगीकरण कक्षात दाखल रुग्ण 46
मंगळवारी तपासणी केलेल्या व्यक्ती 4662
संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 12831
शासकीय संस्थांमधील अलगीकरणातील व्यक्ती 47
गाव पातळीवरील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 10076
नागरी क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 2708
2 मेपासून जिल्हय़ात आलेल्यांची संख्या 132458