वृत्तसंस्था/ पॅरीस
फ्रान्सच्या नान्तेस या शहरातील ऐतिहासिक गॉथिक कॅथेड्रल या चर्चला शनिवारी मोठी आग लागली आहे. या घटनेत चर्चच्या दर्शनी भागाची मोठी हानी झाली. ही आग घातपाताने लावण्यात आली आहे का, याचा शोध घेतला जात आहे. आग लागली तेव्हा या परिसरात नागरीक व पर्यटकांची गर्दी होती.
या दुर्घटनेत कोणतीही जिवीत हानी झाली नाही. सकाळी आग लागल्याने प्रत्यक्ष चर्चमध्ये फारशी लोक नव्हते. अग्निशमन यंत्रणा त्वरित कार्यरत झाल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. चर्चचे छप्पर सुरक्षित असल्याने ते पूर्णतः कोसळले नाही. त्यामुळे या आगीची तुलना 2019 मध्ये नोत्र दाम येथे चर्चला लागलेल्या आगीशी करता येणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले. मात्र पाठेपाठ दोन वर्षांमध्ये दोन ऐतिहासिक चर्चेसची आगीमुळे हानी झाल्याने प्रशासनाने ऐतिहासिक वास्तूंच्या सुरक्षेचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या परिसरात सेंट पीटर आणि सेंट पॉल ही चर्चेससुद्धा असल्याने अधिक काळजी घेण्यात येईल असे प्रशासनाने म्हटले आहे.