ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतीय बनावटीच्या ‘COVAXIN’ या कोरोना प्रतिबंधक लसीच्या मानवी चाचणीला आता सुरुवात झाली आहे. भारत बायोटेक या फार्मा कंपनीने ही देशातील पहिली कोरोना प्रतिबंधक लस तयार केली आहे.
हैदराबादच्या जिनोम व्हॅलीमध्ये असलेल्या भारत बायोटेकच्या बीएसएल -3 हाय कन्टेंनमेंट फॅसिलिटीमध्येही लस विकसित करण्यात आली आहे. दिल्लीतील इंडियन काउंन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चसोबत मिळून भारत बायोटेक दोन टप्प्यात ही मानवी चाचणी घेणार आहे.
18 ते 25 वर्ष वयोगटातील 375 स्वयंसेवकांना कोवॅक्सिनचा पहिला डोस देण्यात येणार आहे. 14 दिवसानंतर त्यांना दुसरा डोस देण्यात येईल. त्यानंतर त्यांना तपासणीसाठी नेण्यात येणार आहे. या स्वयंसेवकांमध्ये दिल्लीतील एआयआयएसएसमधील 100 जण असणार आहेत.