सावगांव, टिसर्च कॉलनी, अक्षता कॉलनी येथील रुग्ण दगावले, 62 नवे रुग्ण,
प्रतिनिधी/ बेळगाव
गेल्या 24 तासांत सौंदत्ती येथील निवृत्त पोलीस उपनिरीक्षकासह पाच जणांचा कोरोना महामारीमुळे मृत्यू झाला आहे तर आणखी 62 नव्या रुग्णांची भर पडली असून बेळगाव तालुक्मयातील 37 जणांचा यामध्ये समावेश आहे. मृतांत सावगांव, टिसर्च कॉलनी व अक्षता कॉलनी येथील बाधितांचा समावेश आहे.
आरोग्य विभागाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सावगांव येथील 55 वषीय महिला, अक्षता कॉलनी येथील 52 वषीय रहिवासी, टिसर्च कॉलनी खासबाग येथील 49 वषीय रहिवाशाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सौंदत्ती येथील 65 वषीय निवृत्त पोलीस उपनिरीक्षक व गोकाक येथील एका 60 वर्षीय वृद्धाचाही कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
सिव्हिल हॉस्पिटलमधील जिरॅटिक व कोरोना वॉर्डमध्ये रोज पाचहून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. सोमवारी पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत कोरोनाबाधितांना तातडीने उपचार मिळेल, याची व्यवस्था करण्याची सूचना अधिकाऱयांना केली आहे. मृत्यूचे प्रमाण घटविण्यासाठी आवश्यक उपाय योजना करण्याचेही पालकमंत्र्यांनी अधिकाऱयांना सांगितले आहे.
दरम्यान 62 नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये बेळगाव शहर व तालुक्मयातील 37 जणांचा समावेश असून अथणी तालुक्मयातील 10, चिकोडी तालुक्मयातील 9 व हुक्केरी तालुक्मयातील एकाचा समावेश आहे. एका अथणी तालुक्मयातील 3 हजार 538 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली असून या एकाच तालुक्मयातील बाधितांची संख्या 255 वर पोहोचली आहे.
बेळगाव येथील शिवाजीनगर, जेएनएमसी कॅम्पस, बेळगुंदी, सांबरा एअरफोर्स, दरबार गल्ली, गणेशपूर, कॅम्प, सुळगा (हिंडलगा) परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी लक्षणे असणाऱयांवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तर लक्षणे नसणाऱयांवर कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार करण्यात येत आहेत.
सांबरा एटीएसमध्ये रुग्णसंख्या वाढती
सांबरा येथील एअरफोर्स ट्रेनिंग सेंटरमध्ये कोरोना रुग्ण संख्या वाढती आहे. 16 जुलै रोजी एटीएएसमधील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर दुसऱया दिवशी 16 जण व रविवारी 2 असे एकूण 20 जणांचे अहवाल पॉझिटिक्ह आले आहेत. त्यांच्यावर एअरफोर्स आवारातील कोविड वॉर्डमध्ये उपचार करण्यात येत आहेत. सध्या प्रशिक्षणासाठी 2 हजार 168 हून अधिक जण या सेंटरमध्ये आहेत. त्यामुळे काळजी वाढली आहे. राज्य राखीव दल, शहर सशस्त्रदल, आयटीबीपीच्या जवानांबरोबरच आता एअरफोर्समध्येही कोरोनाचा शिरकाव झाला आहे.
आणखी 2 हजार अहवाल प्रलंबित
जिल्हय़ातील आणखी 2 हजार 79 अहवाल यायचे आहेत. रविवारी रात्रीपासून दोन्ही प्रयोग शाळेचे काम मंदावल्याने प्रलंबित स्वॅबची संख्या वाढली आहे. आतापर्यंत जिह्यातील 35 हजार जणांचे स्वॅब तपासणी करण्यात आली असून 435 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 618 जणांवर उपचार करण्यात येत आहेत.
मृतांच्या आकडय़ाने केले अर्धशतक पार
जिह्यातील कोरोना बाधितांच्या मृत्यूंचे प्रमाण वाढतेच आहे. रविवारी सायंकाळपर्यंत 45 हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. सोमवारी सायंकाळपर्यंत हा आकडा आणखी पाचने वाढला. त्यामुळे मृतांच्या आकडय़ानेही अर्धशतक पार केले आहे.