प्रतिनिधी / बेळगाव
येत्या 5 ऑगष्ट 2020 रोजी आपल्या समस्त हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या अयोध्यापती प्रभू रामचंद्र जन्मस्थाना ठिकाणी असंख्य हिंदू धर्माभिमानी,कारसेवकांच्या बलीदानानंतर, कोर्टाच्या ऐतिहासिक निकालानंतर रामजन्मभूमीच्या त्याच ठिकाणी भव्य आणि दिव्य असे मंदिरं समस्त हिंदूंच्या सहकार्यातून बांधण्यात येणार आहे त्या मंदिराचे भुमीपूजन शिलान्यास कार्यक्रम आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.त्या कार्यक्रमाला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण उपस्थित राहू शकत नाही. त्यामुळे दिवशी दिनांक 5 ऑगष्ट रोजी श्री. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने या कार्यात बलीदान दिलेल्या त्या शूरवीराची आठवण व मंदिर बांधकामाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे व शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांची अपूरी इच्छा सप्तसिंधू सप्तगंगा मुक्त करा काशीचा विश्वेश्वर सोडवा चुकुर होऊ नका ही शपथ जागण्यासाठी प्रत्येक गावात शिवमुर्तीसमोर नवीन भगवा त्यावर कोणतेही चित्र नसलेला ध्वज लावून विधीवत मुर्ती पुजन करून गोड प्रसाद वाटप करावा व आनंदोत्सव साजरा करावा बेळगांव शहरात छत्रपती शिवाजी उद्यान, धर्मवीर संभाजी चौक, शिवतीर्थ याठिकाणी पहाटे पुजा करण्यात येणार आहे. डोक्यावर पांढरी धारकरी टोपी किंवा भगवा फेटा परीधान करावा व शासनाने कोरोनासाठी घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.