चार विशेष पथक तैनात : नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी केली पाहणी
प्रतिनिधी / मालवण:
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवण शहरात जिह्याबाहेरून येणाऱया सर्व वाहनांची कसून तपासणी करण्याचा निर्णय नगरपरिषदेने घेतला आहे. यासाठी शहरातील चार प्रवेश मार्गांवर विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत.
दरम्यान, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, बांधकाम सभापती यतीन खोत यांनी मंगळवारी प्रवेश मार्गांवर भेट देत कामाचा आढावा घेतला. तसेच मुंबई व अन्य जिह्यातून आलेल्या काही वाहनातील प्रवाशांची स्वत: माहिती घेत प्रवासी पास बाबतही खात्री केली. तपासणी दरम्यान, मुंबई किंवा अन्य जिह्यातून प्रवासी घेऊन येणाऱया वाहनांचे क्रमांक, प्रवाशांचा नाव पत्ता नोंद केला जात आहे. त्यानंतर ग्रामीण रुग्णालयात आरोग्य तपासणी करून गृह अथवा संस्थात्मक क्वारंटाईनबाबत निर्णय घेतला जात आहे. शहरालगत अन्य गावात जाणाऱया वाहनांचीही नोंद ठेवली जात आहे. जिह्याबाहेरून शहरात दाखल होणाऱया व्यक्तीकडे प्रवासी पास असले तरच शहरात प्रवेश दिला जात आहे.
चाकरमान्यांनी आपल्या सोयीसाठी आगाऊ नोंदणी करावी
आगामी काळात शहरात येणाऱया मुंबईस्थित चाकरमानी व अन्य जिह्यातून येणाऱया प्रवाश्यांनी मालवणात येण्यापूर्वी नगरपालिकेकडे नोंद करावी. जेणेकरून चाकरमान्यांची व्यवस्था करणे सुलभ होईल. पालिका कर्मचारी सुधाकर पाटकर (9403558577), जयसिंग गावित, सुनील चव्हाण यांच्याशी संपर्क साधून येणाऱया व्यक्तींनी माहिती द्यावी. जेणेकरून क्वारंटाईन व्यवस्था करणे सोपे होईल. चाकरमान्यांनी आगाऊ नोंदणी करा, असे आवाहन नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी केले.