16 टक्के कमी, कोविड महामारी आणि लॉकडाऊनचा प्रभाव
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना महामारी आणि देशात पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे देशाच्या औद्योगिक उत्पादनावर परिणाम झाला आहे. जून महिन्यातील औद्योगिक उत्पादन 16.6 टक्क्मयांनी घसरले असल्याची माहिती सरकारी आकडेवारीमधून देण्यात आली आहे.
औद्योगिक उत्पादनाच्या कार्यात पुनर्निमिती, खनन, वीज, उत्पादन, गुंतवणूक आदीसह विविध क्षेत्रात घसरणीचे सत्र राहिले आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम क्रियान्वयन मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार मागील वर्षात जूनमध्ये औद्योगिक उत्पादनाच्या निर्देशांकात 1.3 टक्क्मयांची वृद्धी नोंदवण्यात आली होती.
परंतु दुसऱया बाजूला महिन्याच्या आधारे आयआयपीमध्ये सुधारणा होत गेल्याची नोंद करण्यात आली आहे. एप्रिलमध्ये निर्देशांक 53.6 होता जो मे महिन्यात सुधारत 89.5 आणि जूनमध्ये 107.8 वर राहिला आहे.
उपलब्ध आकडेवारीनुसार महिन्यामध्ये पुनर्निमाण क्षेत्राचे उत्पादन 17.1 टक्क्मयांवर तर खनन आणि वीज उत्पादनात 19.8 आणि 10 टक्क्मयांची घसरण नोंदवण्यात आली आहे. चालू वित्त वर्षात एप्रिल ते जून तिमाहीच्या दरम्यान आयआयपीमध्ये 35.9 टक्क्मयांची घसरण झाली आहे.