ऑनलाईन टीम / मनामा :
बहरीनची राजधानी मनामाजवळ असलेल्या जफेअरमधील एका सुपरमार्केटमध्ये बुरखा परिधान केलेल्या महिलेने मुस्लिम देशात गणेश मूर्ती विकण्यास परवानगी नाही, असे जोरजोरात ओरडत तेथील गणेश मूर्तींची तोडफोड केली. या प्रकारचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
बुरखाधारी 54 वर्षीय महिलेविरोधात धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बहालरीनच्या गृह मंत्रालयानेही यासंदर्भात निवेदन प्रसिद्ध केले आहे.
व्हायरल व्हिडिओत बुरखा घातलेल्या दोन स्त्रिया सुप्रमार्केटमध्ये जातात. तिथे गणेश मूर्ती पाहतात. मग एक स्त्री मूर्ती उचलून जमिनीवर फेकू लागते. ‘हा मुस्लिम देश आहे, या मूर्तींची पूजा कोण करते? पोलिसांना फोन करा’, असे ती अरबी भाषेत ओरडत गणेश मूर्ती जमिनीवर फेकत असल्याचे दिसत आहे. व्हिडिओबद्दल अनेकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. सोशल मीडियावरही या महिलेविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून, महिलेच्या अटकेची मागणी जोर धरत आहे.