गेल्या आठवडय़ाच्या शेवटच्या दिवशी बाजारात चांगलीच घसरण झाली. सेन्सेक्समध्ये 433 अंकांची तर निफ्टीत 122 अंकांची घसरण झाली. सर्वाधिक घसरण झाली ती ऍक्सिस बँकेच्या शेअरमध्ये. या बँकेचे शेअर 2.81 टक्क्मयांनी घसरले. एसबीआय, महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज फायनान्स, आयटीसी, एचडीएफसी बँक, एचसीएल टेक आणि इंडसइंड बँक यांचे शेअरही घसरले. तर सन फार्मा, एनटीपीसी, टाटा स्टील, टायटन आणि इन्फोसिसचे शेअर 2.04 टक्के वधारले. पण शेवटच्या दिवसाची घसरण पाहून येत्या आठवडय़ातही घसरणीचाच टेंड राहील असे वाटते.
शुक्रवारी गेल्या आठवडय़ाच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण झाली. जागतिक बाजारांत नकारात्मक टेंड आल्याने त्याचा प्रभाव इथेही पडला. शुक्रवारच्या दिवसभराच्या व्यवहारात सेन्सक्स 663 अंकांनी खाली आला आणि शेवटी 433.15 अंकांनी घसरून 37,877.34 अंकावर बंद झाला तर निफ्टी 122.05 अंकांनी घसरून 11,170.40 वर बंद झाला.
चीनमध्ये औद्योगिक उत्पादन आणि किरकोळ विक्रीची आकडेवारी निराशाजनक आल्याने जागतिक बाजारांत घसरण झाली. पॅरिस, लंडनचे बाजार तर सुरूवातीच्या सत्रात दोन टक्क्मयांपर्यंत घसरले. तर आशियाई बाजारांत हाँगकाँगचा हँगसेंग आणि दक्षिण कोरियाचा कॉस्पी घसरले होते. आणि चीनचे शांघाय कम्पोजिट आणि जपानचा निक्की हे बाजार वधारले होते.
आजपासून चालू होणाऱया आठवडय़ात घसरणीचा टेंड राहील अशी चिन्हे आहेत. गेल्या आठवडय़ात निफ्टी 11,300-11,350च्या पातळीवरून खाली घसरू लागल्यावर त्याला नियंत्रणात ठेवणे अशक्मय झाले. आणि या आठवडय़ातही तोच टेंड राहील.
वास्तविक पाहता जागतिक बाजारांच्या तुलनेत भारतीय शेअर बाजारांनी बराच संयम आणि सकारात्मकता दाखवली आहे. पण अमेरिकन डॉलरची अतिविक्री झाली आहे आणि महत्वाच्या सूचकांकांवर सकारात्मक विचलन आढळून येत आहे, यामुळे जागतिक शेअर बाजारांच्या तेजीवर किंचितसा परिणाम होण्याची शक्मयता आहे. निफ्टीला 11,280 आणि 11,400 या पातळय़ांवर प्रतिरोध होण्याची शक्मयता आहे तर 11,065 आणि 10,900 या पातळीवर समर्थन मिळेल.
या आठवडय़ात म्हणूनच आक्रमकपणे बाजारात उतरू नका. सावधगिरी बाळगून आणि शांत राहून व्यवहार करणे योग्य ठरेल. निफ्टीत ऑटो आणि आयटी सूचकांक तेजी दर्शवत होते. आता त्यातील ऑटोची वाटचाल घसरणीकडे सुरू आहे. तर फायनान्शियल सर्विसेस, पीएसयू बँका आणि बँक निफ्टी यांच्यात सुधारणा होताना दिसते आहे. येत्या आठवडय़ात त्यांची कामगिरी चांगली होईल अशी अपेक्षा आहे. एनर्जी, फार्मा आणि इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातही थोडीफार घसरणीची अपेक्षा आहे. एफएमसीजी क्षेत्रातही घसरणीचे संकेत मिळत आहेत.
नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीची आकडेवारी आता विविध कंपन्या जाहीर करू लागल्या आहेत. भारत पेट्रोलियम कॉर्प लिमिटेड (बीपीसीएल) ची आकडेवारीही जाहीर झाली आहे. पहिल्या तिमाहीतील कंपनीचा फायदा जवळजवळ दुप्पट होऊन 2076 कोटी रुपयांवर पोचला आहे. तर सरकारी कंपनी पीएफसीचाही फायदा जूनअखेरच्या तिमाहीत 23 टक्क्मयांनी वाढला आहे. मुरूगप्पा समूहाची चोलामंडलम फायनान्शियल होल्डींग्जचा जूनअखेर तिमाहीतील फायदा 589.46 कोटींवर गेला आहे. या आठवडय़ात या कंपन्यांचे शेअर्स वधारतील. त्याचबरोबर एनबीसीसी, एम अँड एम फायनान्शिअल सर्विसेस, इक्विटास होल्डींग्ज, आदित्य बिर्ला फॅशन, टेक महिंद्रा, युनायटेड स्पिरीट्स, एमएमटीसी, सद्भाव इंजिनियरिंग, सद्भाव इन्फ्रा, स्टर्लाईट टेक्नॉलॉजीज, अपोलो मायक्रो सिस्टम्स, धनलक्ष्मी बँक, गोदरेज ऍग्रोवेट, रेडिको खेतान या शेअर्समध्ये तेजीचा टेंड दिसेल.
बाजारात अस्थिरतेचे संकेत मिळेत आहेत. एक तर कोविड महामारीचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. आणि त्यामुळे अर्थव्यवस्था पुन्हा अडचणीत आली आहे. जसजसे सर्व व्यवहार सुरळीत तसतसे कोविड रुग्णांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे शेअर बाजारांवरही त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्मयता नाकारता येत नाही. म्हणूनच सावध राहून आणि अभ्यास करूनच गुंतवणूक करणे फलदायी ठरणार आहे.
– संदीप पाटील