वार्ताहर /घटप्रभा :
आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी गोकाक तालुक्यामध्ये 48 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. यापैकी गोकाक शहरातच 35 नवे रुग्ण आहेत. याशिवाय घटप्रभा 4, कोळवी 3 तसेच अंकलगी, बिरनगड्डी, कोण्णूर, कुलगोड, शिवापूर, पामलदिनी येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला आहे. या रुग्णांना गोकाक येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी पाठवून देण्यात आले.
हुक्केरी तालुक्यात 9 कोरोना पॉझिटिव्ह
हुक्केरी : गुरुवारी तालुका आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार हुक्केरी तालुक्यामध्ये 9 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये संकेश्वर येथे 3, हुक्केरीत 2 तर हत्तरगी, इस्लामपूर व शहाबंदर येथे प्रत्येकी 1 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला.