ऑनलाईन टीम मुंबई :
महाराष्ट्रात मागील 24 तासात 10,441 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 258 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 6 लाख 82 हजार 383 वर पोहचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 22 हजार 253 एवढा आहे.
रविवारी दिवसभरात 8 हजार 157 रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यात आतापर्यंत 4 लाख 88 हजार 271 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 1 लाख 71 हजार 542 रुग्ण उपचार घेत आहेत. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 71.55 % आहे. तर मृत्यू दर 3.26 % आहे.
प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 36 लाख 16 हजार 107 नमुन्यांपैकी 6 लाख 82 हजार 383 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 12 लाख 30 हजार 982 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 34 हजार 820 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.