कोविड लढाईत सरकारचा आत्मविश्वास कमी
प्रतिनिधी / पणजी
आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गोव्यातील जनतेला गणेश चतुर्थीनिमित्त कोंकणीतून खास संदेश पाठवताना एक संकेत दिला होता. त्यास अनुसरुन पक्षाच्या स्थानिक युनिटने आज ’ऑक्सीमित्र’ मोहिमेची घोषणा केली. गोव्यातील खेडय़ात व गावात पक्षाच्या स्वयंसेवकांना पल्स ऑक्समीटरने तैनात करून गरजू लोकांना ऑक्सजिनची पातळी तपासण्यासाठी तसेच कोविड रूग्णांना वैद्यकीय पातळीवर आधार उपलब्ध करुन देण्यासाठी काम करणार आहेत.
पक्ष कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सरकारचे माजी वैद्यकीय अधिकारी डॉ. मारियानो गुदीन्हो यांच्या हस्ते मोहिमेला प्रारंभ केला. आपचे संयोजक एल्वसि गोम्स म्हणाले की, पक्षाने मुख्यमंत्र्यांना भेटून व प्रयत्न करूनही सामान्य माणूस हवे तसे सरकारचे लक्ष वेधुन घेऊ शकत नाही. प्रमोद सावंत सरकार आरोग्य क्षेत्रांत बळकट होण्यास अपयशी ठरले आहे. ते म्हणाले की, दिल्लीतील कोविड-19 च्या विरोधात लढा देऊन सर्वसामान्यांचा आत्मविश्वास वाढविण्यात यशस्वी झालेले आप, गोव्यातील ’आम आदमी’ला पूर्णपणे आस्थापनाच्या दयेला सोडू शकला नाही. ते म्हणाले की ऑक्समीटर लोकांच्या ऑक्सजिनची पातळी शोधून काढण्यास मदत करते जेणेकरुन रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे की नाही याचा निर्णय घेण्यास मदत होते. ते म्हणाले की, “ऑक्सािमित्र” म्हणून नियुक्त केलेले आपचे स्वयंसेवक गोव्यातील प्रत्येक खेडय़ात आणि गावात तैनात केले जातील, ज्यांना अगदी थोडय़ा अंशी सुध्दा भीतीचा धोका असेल त्याना मदत होईल.
गोम्स वर ऑक्समीटरची चाचणी करुन ड्राइव्ह सुरू करणाऱया डॉ. गुदीन्हो यांनी स्वयंसेवकांना होणारा धोका कमी करण्यासाठी, ऑक्समीटरचा वापर करण्यापूर्वी आणि नंतर बोटाची स्वच्छता करणे, हातमोजे आणि चेहरा कवच यांचा वापर करण्याच्या पद्धती दर्शविल्या. ते म्हणाले की या सेवेमुळे लोकांमध्ये आत्मविश्वास वाढेल. विशेषतः लक्षणे असणाऱयांनी ऑक्सजिनची पातळी जाणून घ्यावी कारण ऑक्सजिनची कमतरता हे कोणत्याही कोविड पेशंटमध्ये गुंतागुंत होण्याचे मुख्य कारण असते.
हे ऑक्सीमित्र पल्स ऑक्समीटर घेऊन सज्ज असतील. आम्ही ताप आलेल्या, श्वासोच्छवासाचा त्रास असलेल्या किंवा खोकला झालेल्या प्रत्येक नागरिकाला त्यांच्या नियुक्त ऑक्सािमित्राशी संपर्क साधण्यासाठी आवाहन करीत आहोत, जे येऊन ऑक्सजिनची पातळी तपासतील. जर त्यांच्या ऑक्सजिनची पातळी कमी असेल तर त्यांना पुढील वैद्यकीय मदत मिळविण्यात देखील ते मदत करेल. कोविड मध्ये आपण बर्या चदा ’हैप्पी हायपोक्सया’ नावाची घटना पाहतो, ज्यामध्ये एखाद्या रुग्णाला धोकादायकपणे ऑक्सजिनची पातळी कमी असते परंतु त्याबद्दल जागरूकता नसू शकते.” गुदीन्हो यांनी यावेळी सुरु केलेल्या सेवेचे कौतुक केले.
सरकार पुरेसे पारदर्शक नसून कोविडशी लढण्याची व्यापक योजना न घेतल्याबद्दल गोम्स यानी खेद व्यक्त केला. ते म्हणाले की, “आम्ही फक्त आळशीपणाने बसून आपल्या सहकाऱयांच्या दैनंदिन होणाऱया प्राणहानीच्या आंकडय़ाकडे लक्ष देण्याची सरकार अपेक्षा करतो का? सर्वच पक्षांकडून मदत घेण्याऐवजी माध्यमांनी ठळकपणे दाखवल्या प्रमाणे सरकार भ्रष्टाचारात अडकत होते.
दरम्यान गोम्सने ऑक्समीटर देणगी देणाऱया गोव्यातील नागरिकांचे आभार मानले आणि अशा प्रकारच्या अधिक देणग्यांसाठी आवाहन केले जेणेकरुन त्यांना आवश्यक असलेल्या अधिक लोकांपर्यंत ऑक्समीटर पोहोचता यावे. रोमाल्डो रेगो यांनी 50 आणि जासिन्त गुदीन्हो यांनी 20 ऑक्समीटर देणगी स्वरुपात दिले आहेत. अनेकांनी कमी प्रमाणात ते दिले आहेत. संकटांच्या काळात गोवेकरांची काळजी घेण्यासाठी आपवर विश्वास ठेवत असल्याचे हे दर्शविते” असे गोम्स म्हणाले.