ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. मागील 24 तासात 16,408 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 296 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 7 लाख 80 हजार 689 वर पोहचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 23 हजार 775 एवढा आहे. त्यामुळे राज्यात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.
- महाराष्ट्रात 1 लाख 93 हजार 548 रुग्णांवर उपचार सुरू
रविवारी दिवसभरात 7,690 रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यात आतापर्यंत 5 लाख 62 हजार 401 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 1 लाख 93 हजार 548 रुग्ण उपचार घेत आहेत. एकट्या पुणे शहरातच 51,909 रुग्ण उपचार घेत आहेत. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 72.04 % आहे. तर मृत्यू दर 3.130% आहे.
प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 40 लाख 84 हजार 754 नमुन्यांपैकी 7 लाख 80 हजार 689 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 13 लाख 09 हजार 676 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 35 हजार 373 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- शहरे ॲक्टिव्ह रुग्ण संख्या
- मुंबई : 20,321
- ठाणे : 20,976
- पुणे : 51,909
- नाशिक : 11,703
- नागपूर : 11,574
- रायगड : 5,598