ऑनलाईन टीम / टिहरी :
उत्तराखंडातील भाजपचे आमदार विनोद चमोली यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्या सोबतच सचिवालयातील एका अपर सचिवाला देखील कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आमदार विनोद चमोली यांना मागील काही दिवसांपासून ताप येत होता. त्यामुळे त्यांची चाचणी केली असता आज त्या चाचणीचे रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आले आहेत. त्यानंतर चमोली हे एम्स ऋषिकेश हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यासाठी रवाना झाले आहेत.
तर सचिवालयातील एका सचिवास कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांचे संपर्ण कार्यालय सील करण्यात आले आहे. बाहेरून येणाऱ्या लोकांना सचिवालयात येण्यास बंदी घातली आहे. याबाबतचे आदेश शासनाकडून जारी करण्यात आले आहेत.