बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूरमध्ये केंद्र सरकारने जारी केलेल्या ‘अनलॉक ४’ ‘मार्गदर्शक तत्त्वाखाली मेट्रो सेवा पुन्हा सुरु करण्याची तयारी जोरात सुरू आहे. बेंगळुरूमध्ये ७ सप्टेंबरपासून मेट्रोची सेवा सुरू होणार असली तरी ती केवळ जांभळ्या मार्गावर सुरु केली जाईल. ग्रीन लाइनवरील मेट्रो सेवा ९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. मेट्रो सेवांच्या वेळेतही बदल करण्यात आला असून प्रवाशांना हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
बेंगळूर मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (बीएमआरसीएल) प्रसिद्धी केली आहे की पहिल्या टप्प्यात मेट्रोच्या जांभळ्या मार्गावरील सेवा ७ सप्टेंबर ते सकाळी ८.०० ते सकाळी ११.०० पर्यंत आणि संध्याकाळी ०४.३० ते संध्याकाळी ०७.३० दरम्यान सुरू असेल. ९ सप्टेंबरपासून यळचिनहळ्ळी ते नागासंद्र दरम्यान ग्रीन लाइनवरील मेट्रो सेवेची वेळ सारखीच राहील.
मुख्य जनसंपर्क अधिकारी बी.एल. यशवंत चव्हाण यांनी ११ सप्टेंबरला दोन्ही मार्गांवर सकाळी नऊ वाजता मेट्रोची सेवा सुरू होईल. अशी माहिती दिली आहे.