मेष: महत्त्वाच्या आर्थिक कामात यश मिळेल पण वादावादी टाळा.
वृषभः मंत्र-तंत्र शिकण्याची हौस पूर्ण होईल, त्याच्या आहारी जाऊ नका.
मिथुन: ऐनवेळी गरजेपुरता पैसा मिळेल पण चैनी वृत्ती आवरा.
कर्क: वाचन, चिंतन, मनन यात वेळ जाईल, काहींना प्रसिद्धी योग.
सिंह: वक्तृत्वाची आवड असेल तर त्यात यश मिळेल.
कन्या: जपजाप्यामुळे गंभीर संकटातून वाचाल.
तुळ: गूढ विषयात प्रगती, तंत्र-मंत्र यांची आवड निर्माण होईल.
वृश्चिक: काही बाबतीत जरा स्वार्थी आणि व्यवहारी राहावे लागेल.
धनु: व्यावहारिकता आणि बुद्धिमत्ता यांचा सुरेख संगम साधाल.
मकर: दैवी कृपेने धनलाभ आणि प्रसिद्धी योग.
कुंभ: कामाचा ताण वाढल्याने मन सैरभैर होईल.
मीन: सुस्वभावी व व्यवहार कुशल व्यक्तींचे मार्गदर्शन लाभेल.