बेंगळूर/प्रतिनिधी
मंगळवारी रात्री बेंगळूरच्या अनेक भागाला मुसळधार पावसाने झोडपले. यामध्ये अनेक झाडे कोसळली व वाहने रस्ते सोडून खाली उतरली. शहरातील सहकार नगर, होरामावू, हेन्नूर, दशरहळ्ळी, पिन्या आणि एचबीआर लेआउटसह अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याची माहिती रहिवाशांनी दिली. या पावसामुळे चिक्कबनावर तलाव, व्हाइटफील्डमधील शीलावंठकेरे, रेचेनहळ्ळी, नागावारा आणि हेब्बळ तलाव ओसंडून वाहू लागला आहे.
भारतीय हवामान विभाग (आयएमडी) च्या मते, बुधवारी सकाळी ०८.३० वाजता २४ तास संपताना जक्कूरमधील गांधी कृषी विज्ञान केंद्राच्या (जीकेव्हीके) कॅम्पसमध्ये ९२ मिमी, बेंगळूर सिटीमध्ये ६१ मिमी, बेंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळ १०३ मिमी आणि एचएएल विमानतळ २६.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.