बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकमध्ये बुधवारी कोरोना रुग्ण संख्येत वाढ झालेली पाहायला मिळाली. राज्यात बुधवारी गेल्या चोवीस तासात कोरोना संसर्गाची ९,५४० नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत. तर राज्यात ६,८६०रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. आरोग्य विभागाने जारी केलेल्या बुलेटिननुसार राज्यात कोरोनाचे ९९,४७० सक्रिय रुग्ण आहेत. बुधवारी राज्यात ७०,३२२ चाचण्या घेण्यात आल्या. राज्यत २४ तासात १२८ कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बेंगळूर शहरी जिल्ह्यात ३,४१९ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे.