नवी दिल्ली
सॉफ्टवेअर क्षेत्रातील कंपनी टीसीएस ही 9 लाख कोटींच्या बाजार भांडवलीमूल्यासह पहिलीवहिली आयटी कंपनी बनली आहे तर रिलायन्सनंतरही ही दुसऱया नंबरची भारतीय फर्म ठरली आहे. टीसीएसचे समभाग पहिल्यांदा सोमवारी सेन्सेक्स बाजारात 3 टक्क्यांनी चढत 2 हजार 453 वर पोहचले. सकाळच्या बाजारात व्यवहारावेळी टीसीएसच्या भांडवली मूल्याने 9 लाख कोटींचा आकडा पार केला. बाजारात या कंपनीचे समभाग चढल्याचे दिसून आले. एनएसई सेन्सेक्समध्ये या कंपनीच्या समभागात 2.76 टक्यांची उसळी दिसली आणि 2 हजार 439.80 च्या विक्रमी स्तरावर भाव पोहचल्याचे दिसून आले. समभागात वाढ झाल्याने त्याचा परिणाम भांडवली मूल्यावर झाला व ते 9 लाख 14 हजार 606.25 कोटी रुपयांवर पोहचले. रिलायन्स इंडस्ट्रिज या आधी 9 लाख कोटींचे बाजारमूल्य मिळवत पहिली कंपनी ठरली होती.