प्रतिनिधी / सातारा :
सातारा नगर परिषदेतील कोरोना संकटाशी लढणाया अधिकारी, कर्मचायांसाठी आपत्कालीन वैद्यकीय उपचारासाठी 50 लाख रुपयांचा निधी तात्काळ राखीव ठेवण्यात यावा, तसेच कर्मचायांसाठी 10 बेडचे कोविड केअर सेन्टर उभारण्याची मागणी रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनच्यावतीने मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याकडे करण्यात आली आहे.
जिल्हाध्यक्ष गणेश दुबळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की कोरोना व्हायरसचा पार्श्वभूमीवर सातारा नगर परिषदेमधील अधिकारी-कर्मचारी गेली 6 महिने कोरोना संकटाशी अहोरात्र लढत आहेत.स्वच्छता,घरोघरी जावून सर्वेक्षण,कंटेंटमेंटझोन मध्ये काम करणे,चेक पोस्ट डय़ुटी,कराच्या स्लिप वाटणे,घरपट्टी, पाणीपट्टी भरणा, विविध दाखले,परवानगी देणे अश्या विविध माध्यमातून ते सतत लोकांशी संपर्कात आहेत.यामुळे सातारा नगर परिषदेचे अनेक कर्मचारी कोरोना बाधित झाले आहेत.ते शहराची सेवा करत असूनही त्यांना वेळेवर बेड मिळत नाहीत.सर्वसामान्य कर्मचायांना खाजगी हॉस्पिटलमधील खर्च परवडत नाही.यामुळे कर्मचारी दगावण्याची शक्यता आहे. तरी सातारा नगर परिषदेतील कोरोना संकटाशी लढणाया अधिकारी-कर्मचायांसाठीच्या आपत्कालीन वैद्यकीय उपचारासाठी 50 लाख रुपयांचा निधी तात्काळ राखीव मंजूर करावा तसेच कर्मचायांसाठी जुन्या नगर परिषद कार्यालयातील हॉलमध्ये 10 बेडचे कोविड केअर सेन्टर उभारणी करावी,अशी मागणी करण्यात आली आहे.