ऑनलाईन टीम / कोलंबो :
श्रीलंकेतील नारळाच्या तुटवड्यावर भाष्य करण्यासाठी तेथील राज्यमंत्री अरुंदिका फर्नांडो चक्क नारळाच्या झाडावर चढले.
श्रीलंकेत घरगुती वापरासाठी आणि उद्योगधंद्यांच्या वाढत्या मागणीमुळे तेथे 700 दशलक्ष नारळाची टंचाई आहे. त्यामुळे नारळाच्या किंमती कमालीच्या वाढल्या आहेत. त्यावर मात करण्याचे सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. याविषयी बोलण्यासाठी फर्नांडो चक्क नारळाच्या झाडावर चढले. त्यांनी झाडावर चढू नये म्हणून अनेकांनी त्यांनी विनंती केली. मात्र, ते हट्टावर कायम राहिले.
फर्नांडो म्हणाले, श्रीलंकेत उपलब्ध असलेल्या काही जागांचा नारळाच्या उत्पादनासाठी वापर करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. लवकरच नारळाच्या किंमती नियंत्रणात येतील.