बेळगाव
येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यालयाचा उद्घाटन समारंभ बालशिवाजी वाचनालय, शिवाजी रोड, येळ्ळूर येथे पार पडला. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेचे पूजन विवेक मेणसे व उपस्थित पाहुण्यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शांताराम कुगजी होते. कार्यालयाचे उद्घाटन सीमा सत्याग्रही व्यंकोबा टक्केकर व सहकाऱयांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पंचायत माजी सदस्य अर्जुन गोरल, एल. आय. पाटील, कृष्णा घाडी, विलास घाडी, विवेक मेणसे, प्रकाश घाडी, महादेव सायनेकर, वामन पाटील, दौलत पाटील, वाय. सी. इंगळे, युवा समिती बेळगावचे पदाधिकारी, शिवसेना नेते तसेच शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक दुधाप्पा बागेवाडी कार्याध्यक्ष येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समिती यांनी केले. सूत्रसंचालन प्रकाश अष्टेकर यांनी केले. शेकाप नेते विलास घाडी, युवा समिती कार्याध्यक्ष धनंजय पाटील, सरचिटणीस एल. आय. पाटील, जि. पं. माजी सदस्य अर्जुन गोरल यांनी आपले विचार मांडले. यानंतर अध्यक्षीय भाषण झाले. सतीश पाटील यांनी आभार माणले. यावेळी नवहिंद क्रीडा केंद्राचे पदाधिकारी उदय जाधव, प्रदीप मुरकुटे, संभाजी कणबरकर, शिवाजी सायनेकर, नारायण कुंडेकर, दशरथ पाटील, तसेच येळ्ळूर विभाग म. ए. समितीचे सर्व पदाधिकारी, परशराम परीट, रमेश मेणसे, राकेश परीट, सुभाष धुळजी, प्रकाश पाटील, सूरज गोरल, नागेश बोबाटे, शिवाजी कदम, परशराम घाडी, महेश जाधव, यल्लाप्पा कुगजी, संदीप पाटील, राजू उघाडे, कृष्णा शहापूरकर, अजित पाटील, शिवाजी गोरल, गोपाळ शहापूरकर, महादेव कुगजी आदी उपस्थित होते.