वृत्तसंस्था/ लंडन
यजमान इंग्लंड आणि विंडीज महिला क्रिकेट संघामध्ये तीन सामन्यांची टी-20 मालिका ख्sाळविली जात आहे. सोमवारी या मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडने विंडीजचा 47 धावांनी पराभव करून विजयी सलामी दिली. या सामन्यात इंग्लंडच्या टॅमी बेमाँटने शानदार अर्धशतक झळकविले.
या सामन्यात इंग्लंडने 20 षटकांत 8 बाद 163 धावाह जमविल्या होत्या. इंग्लंडतर्फे टॅमी ब्युमाँटने 49 चेंडूत 62 धावा जमविल्या. इंग्लंडची कर्णधार नाईटने ब्युमाँटसमवेत 6 षटकांमध्ये 52 धावांची भागिदारी केली. नाईटने चार चौकारांसह 25 धावा जमविल्या. यावेळी इंग्लंडची स्थिती 2 बाद 113 अशी भक्कम होती पण त्यानंतर इंग्लंडने आपले सहा गडी 50 धावांच्या मोबदल्यात गमविले. प्रत्युत्तरादाखल खेळताना विंडीजने 20 षटकांत 6 बाद 116 धावा जमविल्याने त्यांना हा सामना 47 धावांनी गमवावा लागला. विडींजतर्फे डॉटीनने एकाकी लढत देत 69 धावा काढल्या. इंग्लंडतर्फे इक्लेस्टोनने 19 धावांत 2 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक : इंग्लंड 20 षटकांत 8 बाद 163 (ब्युमाँट 62), विंडीज 20 षटकांत 6 बाद 116 (डॉटीन 69, इक्लेस्टोन 2-19).