बेंगळूर/प्रतिनिधी
कन्नड चित्रपटसृष्टीत मादक द्रव्यांच्या तस्करी आणि सेवनाची चौकशी बेंगळूरच्या सेंट्रल क्राइम ब्रँच (सीसीबी) कडून केली जात आहे. या प्रकरणी अनेकजण अटकेत आहते. बुधवारी अभिनेता दिगंथला ड्रग प्रकरणात पुढील चौकशीसाठी बोलावले आहे.
गुन्हे शाखेचे सह पोलीस आयुक्त संदीप पाटील यांनी आम्ही फक्त दिगंतला चौकशीसाठी बोलावले असून मागील सुनावणीत त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे काही चौकशी केली गेली होती, आता पुढील चौकशीसाठी त्याला पुन्हा बोलविण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले आहे. समन्सानुसार दिगंथ बुधवारी सकाळी सीसीबी पोलिसांसमोर हजर झाला. याआधी दिगंथ आणि त्यांची पत्नी आंद्रिता रे यांची १६ सप्टेंबरला चौकशी केली गेली होती.