बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूर शहरात ड्रग तस्करी मोठ्या प्रमाणात सुरु आहे. दररोज शहरात एक दोन ड्रग तस्करीच्या केसेस उघडकीस येत आहेत. शहरात ड्रग्ज रॅकेट संदर्भात सातत्याने कारवाई सुरू आहे. त्याच कारवाईचा एक भाग म्हणून बेंगळूर शहर पोलिसांनी गुरुवारी शहरातील श्रीरामपूर येथे एक ड्रग विक्रेता आणि दोन साथीदारांना अटक केली.
याची माहिती देताना पोलीस उपायुक्त (उत्तर) धर्मेंद्रकुमार मीना यांनी श्रीरामपूर पोलीस निरीक्षक आणि पथकाने गुन्हेगारांकडून ४० किलो गांजा (गांजा) जप्त केला आहे. पोलिसांनी एका तस्करासह दोघं जणांना अटक केली आहे.