210 जण झाले कोरोनामुक्त , महिलेसह चौघा जणांचा मृत्यू
प्रतिनिधी /बेळगाव
गुरुवारी एकूण बाधितांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या समाधानकारक आहे. जिह्यातील 210 जण कोरोनामुक्त झाले असून बेळगाव शहर व जिह्यातील 218 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे तर गेल्या 24 तासांत महिलेसह चौघा जणांचा मृत्यू झाला आहे.
उपलब्ध माहितीनुसार गुरुवारी 218 नव्या रुग्णांची भर पडली आहे. बेळगाव शहर व उपनगरातील 75 व ग्रामीण भागातील 12 असे बेळगाव तालुक्मयातील एकूण 87 जणांचा यामध्ये समावेश आहे. बैलहोंगल येथील एका महिलेसह कडोली, नंदिहळ्ळी, मुद्देबिहाळ येथील चौघा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
एकूण बाधितांची संख्या 19 हजार 572 वर पोहोचली असून या पैकी 17 हजार 66 जण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 2 हजार 216 सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यावर वेगवेगळय़ा इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. तर मृतांचा सरकारी आकडा 290 वर पोहोचला आहे.
बिम्स्सह वेगवेगळय़ा इस्पितळातील पाचहून अधिक कर्मचाऱयांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस, आयटीबीपीचे जवान, राज्य राखीव दलाच्या अनेक जवानांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. गुरुवारी एटीएसच्या एका जवानाचा या अहवालात समावेश आहे.
सरस्वतीनगर, अनगोळ, भडकल गल्ली, भाग्यनगर, के. के. कोप्प, बाळेकुंद्री, डिफेन्स कॉलनी, हिंडलगा, काकती, कंग्राळी खुर्द, क्रांतीनगर-गणेशपूर, महादेवनगर-सांबरा, पिरनवाडी, माणिकबाग बोल्डींग स्कूल, मुत्यानट्टी, हनुमाननगर, नेहरुनगर, हिंदवाडी, जेएनएमसी कॅम्पस, कणबर्गी, केळकरबाग, कोनवाळ गल्ली, महाव्दार रोड, माळेनट्टी, बिम्स् परिसर, बॉक्साईट रोड, बुड्रय़ानूर, चन्नम्मानगर, गांधीनगर, रामतीर्थनगर, सदाशिवनगर, शिवबसवनगर, टिळकवाडी, वैभवनगर, विजयनगर, विश्वेश्वरय्यानगर परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.