प्रतिनिधी / बेळगाव
राज्यपाल वजुभाई वाला यांनी सोमवारी सकाळी दिवंगत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या मातोश्री सोमव्वा यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. राज्यपाल राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या पदवीदान समारंभासाठी बेळगावला आले होते. या समारंभाला जाण्यापूर्वी सकाळी त्यांनी अंगडी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या मातोश्री सोमवा पत्नी मंगला, मुली श्रद्धा व स्फूर्ती या सर्वांचे सांत्वन केले.