सांगली / प्रतिनिधी
मोहंमदिया अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्यु.कॉलेज सांगली येथील वरिष्ठ लिपीक अब्दुल समद शेख यांना कृतिशील सेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शिक्षण सेवक सहकारी सोसायटी सांगली येथे महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती यांच्या वतीने विविध पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. पुणे विभागाचे शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते देण्यात आला