बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात गुरुवारी ३,१५६ नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. नेहमी प्रमाणे पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होती. गुरुवारी राज्यातील विविध जिल्ह्यातून ५,७२३ रुग्ण कोरोनावर मात करत घरी परतले. राज्यात सध्या ३३,०९५ कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत आहेत. तर राज्यात गुरुवारी ३१ कोरोना संक्रमितांचा मृत्यू झाला. आतापर्यंत ११,३१२ रुग्णांचा मृत्यू कोरोना संसर्गामुळे झाला आहे.
राज्यात सर्वाधिक कोरोना बाधितांची संख्या बेंगळूर शहरी जिल्ह्यात आहे. सध्या १६,७१६ रुग्ण उपचार घेत आहेत. गुरुवारी १,६२३ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. तर ३,७०८ रुग्णांनी कोरोनावर मत केली. दरम्यान ९ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आता पर्यंत ३,९२६ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.