इचलकरंजीत नगरसेविकेच्या पतीवर खूनी हल्ला
इचलकरंजी / प्रतिनिधी
इचलकरंजी पालिकेच्या भाजपाच्या नगरसेविकेच्या पतीवर शनिवारी रात्री खूनी हल्ला करून गंभीर जखमी करण्यात आले. या हल्ल्यात विनायक हुक्किरे यांचा मृत्यू झाला. चार ते पाच जणानी कोयता आणि तलवारीने हल्ला केला . जखमी हुक्किरे याला उपचारासाठी सांगली येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्यांची प्रकृती अधिकच गंभीर बनल्याची माहिती डॉक्टरनी दिली.
जखमी हुक्किरे जेवण करण्यासाठी कबनूर येथील हॉटेल रविराज येथे गेले होते. यावेळी त्यांच्यावर चार ते पाच जणाच्या टोळीने सशस्त्र खूनी हल्ला करून गंभीर जखमी केले. हल्लेखोरानी कोयता आणि तलवारीचा वापर केला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. या हल्यात हुक्किरे यांच्यावर अनेक वार करण्यात आले आहेत . त्यापैकी काही वार वर्मी बसल्याने त्यांचा मृत्यू झाला. या खूनी हल्ल्या माहिती समजताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यासह पोलीस कर्मचाऱ्यानी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा शोध घेवून हल्लेखोराचे फुटेज मिळतात काय यांचा शोध सुरु केला आहे .