बेंगळूर /प्रतिनिधी
कर्नाटकचे आरोग्य व वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. के. सुधाकर यांनी गोवंशहत्येमुळे भारतीय परंपरा आणि सांस्कृतिक भावना दुखावल्या जातात. भारतात गाय फार पवित्र मानली जाते. गोहत्या बंदी घालण्यासाठी व्यापक चर्चेची आवश्यकता आहे असे ते म्हणले.
आरोग्य योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर
दरम्यान मंत्री विकास सौध येथे आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या सहसंचालकांशी बैठक घेऊन त्यांनी आयुष्मान भारत-आरोग्य कर्नाटक, मिशन इंद्रधुन लसीकरण कार्यक्रम आदींसह विविध योजना व कार्यक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेतला. योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर जोर दिला.
नंतर मंत्री सुधाकर यांच्या अध्यक्षतेखाली १०८ रुग्णवाहिका सेवेसंदर्भात बैठक घेण्यात आली. ग्रामीण भागात सर्वत्र रुग्णवाहिका सेवा उपलब्ध व्हाव्यात यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या