ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रेटिक पक्षाचे जो बायडेन विजयी झाले. बायडेन यांचे प्रतिस्पर्धी डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांचा पराभव अमान्य आहे. मतमोजणी प्रक्रियेत घोटाळा झाला असून, आपल्याला 7 कोटी 10 लाख अधिकृत मते मिळाल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे.
ट्रम्प म्हणाले, बायडेन यांनी मतमोजणी प्रक्रियेत घोटाळा केला आहे. त्यामुळे बायडेन राष्ट्राध्यक्ष पदावर दावा करू शकत नाहीत. मतदानाची मुदत संपल्यावर आठ वाजेनंतर मेल इन बॅलेटद्वारे आलेल्या मतांची चुकीची मोजणी झाली. तसेच मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात आपण आघाडीवर होतो. मेल इन बॅलटची मोजणी सुरू झाल्यानंतरबायडन यांनी आघाडी घेतली. त्यामुळे या मतमोजणीत घोटाळा झाला आहे. आपल्याला 7 कोटी 10 लाख अधिकृत मते मिळाली आहेत.
दरम्यान, विजयासाठी उमेदवारांना 270 इलेक्टोरल मतांची गरज होती. बायडेन यांना 273 इलेक्टोरल मते, तर ट्रम्प यांना 214 इलेक्टोरल मते मिळाली.