ऑनलाईन टीम / श्रीनगर :
पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीतून (पीडीपी) राजीनामा दिलेले टी.एस. बाजवा, हसन अली वफा आणि वेद महाजन या तिन्ही नेत्यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
पीडीपीच्या अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती यांनी काही दिवसांपूर्वी ‘केंद्र सरकारने हिरावून घेतलेले जम्मू-काश्मीरचे कलम 370 पुन्हा मिळवेपर्यंत तिरंगा झेंडा हाती घेणार नाही’, असे वक्तव्य केले होते. राष्ट्रध्वजाबद्दलच्या या वक्तव्याच्या निषेधार्थ या तिन्ही नेत्यांनी राजीनामा दिला होता.
तसेच या वक्तव्यावरून नाराज झालेल्या नेत्यांनी मुफ्ती यांना पत्रही लिहिले होते. त्यामध्ये म्हटले होते की, आतापर्यंत पक्षाच्या पाठीमागे आम्ही ठामपणे उभे राहिलो. मात्र, तुमच्या देशभक्तीपर वक्तव्याने आम्हाला धक्का बसला आहे. काही घटक पक्षाला चुकीच्या मार्गाने घेऊन जात आहेत. त्यामुळे आम्ही पक्षाचा राजीनामा देत आहे.