मुंबई
गृहकर्ज घेणाऱया खरेदीदारांना एचडीएफसी बँकेने व्याजदरात कपातीची भेट दिली आहे. एचडीएफसी बँकेने रिटेल प्राइम लेंडिंग रेटमध्ये 10 बेसीस पॉइंटस्ची कपात केली आहे. त्यामुळे घर खरेदीदारांचा गृहकर्जाचा बोजा कमी होणार आहे. या कपातीमुळे ग्राहकांना समान मासिक हप्त्यापायी कमी रक्कम भरावी लागणार आहे. बँकेचा व्याजदर 6.90 टक्के इतका आहे. येणाऱया काळात गृहकर्ज घेण्याचे प्रमाण वाढण्याचे संकेत लक्षात घेऊन बँकांनी व्याजदर कपातीचा मार्ग अवलंबला आहे. आतापर्यंत बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, युनियन बँक ऑफ इंडिया यांनी गृहकर्ज व्याजदर अलीकडे कमी केले आहेत.