प्रतिनिधी/ सातारा
नवीन पिढीमध्ये आपल्या पूर्वजांच्या इतिहासाबद्दल रूची निर्माण व्हावी व या मुलांना गडकिल्ल्यांचा इतिहास, त्यांचे महत्त्व कळावे यासाठी दीपावलीचे औचित्य साधून शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय भव्य किल्ले स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
कोरोनामुळे गेल्या आठ महिन्यांपासून मुले मोबाईलवर आहेत. त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व त्यांना शारीरिक श्रमाबरोबरच इतिहासाचीही गोडी लागावी या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेत सहभाग घेऊ इच्छिणार्या स्पर्धकांनी आपण तयार केलेल्या किल्ल्याचे फोटो व व्हीडीओ विशाल जाधव (मो.9511957965), अविनाश फडतरे (मो. 9970545255), जयवंत पाटील (मो. 9922942043) किंवा प्रदीप जाधव (मो. 9890719919) यांच्याकडे दि. 16 नोव्हेंबरच्या रात्रीपर्यंत व्हॉटसऍपवर पाठवावेत.
एका स्पर्धकाने 1 मिनिटांचा एकच व्हीडीओ पाठवावा. त्यानंतर प्राथमिक फेरीत निवड झालेल्या किल्ल्यांची निवड समितीमार्फत पाहणी करण्यात येईल. त्या स्पर्धकांना पाच प्रश्न विचारण्यात येतील. त्यांची अचूक उत्तरे देणार्यांमधून विजेत्यांची निवड करण्यात येईल, अशी माहिती संयोजकांनी दिली. या स्पर्धेतील विजेत्या प्रथम क्रमांकास 10 हजार रूपये, द्वितीय क्रमांकास 7 हजार रूपये, तर तृतीय क्रमांकास 5 हजार रूपयांचे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, असे संयोजकांनी सांगितले.