वृत्तसंस्था/ मुंबई
ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी टोयोटा किर्लोस्कर मोटर्सने धनत्रयोदशीदिवशी कार विक्रीत 12 टक्के इतकी वाढ दर्शविली असल्याचे सांगण्यात येत आहे. उत्सवी काळात टोयोटाच्या मोटारींना ग्राहकांनी पसंती दर्शवली आहे.
यावषी धनत्रयोदशीदिवशी कंपनीच्या कार विक्रीमध्ये मागच्या वषीच्या तुलनेमध्ये 12 टक्के वाढ दिसली आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर या दोन महिन्यांमध्ये ग्राहकांचा कंपनीच्या मोटारींना चांगला प्रतिसाद लाभला असल्याचे कंपनीने म्हटले आहे. धनत्रयोदशीदिवशी गाडीच्या बुकिंगच्या प्रमाणात 10 ते 13 टक्के इतकी वाढ दिसली आहे. यंदा धनत्रयोदशी देशभरात विविध भागांमध्ये दोन दिवस साजरी करण्यात आली. या दोन्ही दिवशी टोयोटाच्या गाडय़ांना चांगली मागणी दिसून आली. विविध ऑफर्सचा विक्री वाढीत फायदा झाला आहे.
कोरोनाच्या महामारीच्या काळात गेल्या काही महिन्यांमध्ये परिस्थितीत सुधारणा झाल्याचे दिसले आहे. विविध ऑफर्स आणि योजनांचा विक्री वाढीत फायदा झाला असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. दिवाळी व नंतरही कंपनीच्या गाडय़ांना चांगला प्रतिसाद अपेक्षीत आहे.