बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक सरकारने आमदार एस आर विश्वनाथ यांची बेंगळूर विकास प्राधिकरणाचे (बीडीए) अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यास अधिसूचित केले आहे. विश्वनाथ शहरातील येळहंका मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. आमदार एस. आर. विश्वनाथ मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचे राजकीय सचिव आहेत.