प्रतिनिधी / खेड
कोकण मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांना होणारी गर्दी कमी करण्यासाठी पश्चिम रेल्वेने विशेष गाड्यांच्या सुधारित वेळेसह कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कोकण मार्गावर ७ ते २८ डिसेंबर या कालावधीत गांधीधाम-तिरुनेलवेली साप्ताहिक महोत्सव विशेष गाडी धावणार आहे.
ही गाडी दर सोमवारी पहाटे ४.४० वाजता गांधीधाम येथून सुटून दुसऱ्या दिवशी ११.३५ वाजता तिरुनेलवेलीला पोहचेल. परतीच्या प्रवासात तिरुनेलवेली येथून दर गुरुवारी सकाळी ७.४० वाजता सुटून तिसऱ्या दिवशी २.४५ वाजता गांधीधाम येथे पोहचेल. ही गाडी वसईमार्गे धावणार असून कोकण मार्गावर पनवेल, रत्नागिरी स्थानकावर थांबे देण्यात आले आहेत.