प्रतिनिधी/ बेळगाव
शिवबसवनगर येथील जोतिबा मंदिरात रविवारी दिपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्त जोतिबाची स्वयंभू केदारनाथच्या रूपात पूजा बांधण्यात आली होती. या निमित्त तब्बल दोन हजार दिव्यांनी संपूर्ण मंदिर परिसर झगमगला होता. दिवे लावण्यासाठी भाविक व महिलांची सायंकाळ नंतर गर्दी झाली होती. दिपोत्सवानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे 5 वा. मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले होते. यानिमित्त मंदिरात जोतिबाच्या रूपातील रांगोळी घालण्यात आली होती. अत्यंत सुरेख पद्धतीने घालण्यात आलेली रांगोळी नेत्रदिपक ठरली. महाअभिषेक, पाद्यपुजा यासह विविध पुजा करण्यात आल्या. हा दिपोत्सव पाहण्यासाठी भाविकांची मोठय़ा प्रमाणात गर्दी झाली होती.