इंदिरा महिला सोसायटीच्यावतीने उभारणी
वार्ताहर/ कुद्रेमनी
येथील मुख्यवेशीतील प्राथमिक मराठी शाळेजवळ बसस्टॉपजवळ बांधलेल्या बसथांब्याचा उद्घाटन कार्यक्रम नुकताच पार पडला. गावातील इंदिरा महिला सोसायटीच्यावतीने बसथांब्याची उभारणी करण्यात आली. सोसायटीच्या चेअरमन इंदुबाई जो. पाटील यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन झाले. व्हा. चेअरमन आश्विनी लोहार व अन्य संचालिकांच्या हस्ते यावेळी पूजन करण्यात आले.
प्रारंभी सोसायटीचे सचिव गुरुनाथ पु. देवण यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. प्रवाशांच्या सोयीसाठी व गाव सुधारणेच्या भावनेतून संस्थेच्यावतीने हा उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
यावेळी संचालिका मल्लव्वा पाटील, शांता देवण, शांता बडसकर, लक्ष्मी रा. पाटील, लक्ष्मी गा. पाटील, शांता पन्हाळकर, सुभद्रा पाटील, गंगुबाई तरवाळ, जयबून मुल्ला, संचालक, सल्लागार, सभासद, ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. ओमकार कदम यांनी सूत्रसंचालक व जयश्री पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.